वकिलाची गळफास घेत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वकिलाची गळफास घेत आत्महत्या
वकिलाची गळफास घेत आत्महत्या

वकिलाची गळफास घेत आत्महत्या

sakal_logo
By

शहापूर, ता. २७ (बातमीदार) ः शहापुरातील नावाजलेले वकील वैभव ख्रिस्ती (४५) यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कालच त्यांचा वाढदिवस होता. सोमवारी सकाळी त्यांचा सहायक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता; मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दरवाजा फोडून आत प्रवेश केला असता वैभव ख्रिस्ती यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे उघड झाले. त्यांचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला आहे. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी बांधला. शहापूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87116 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..