मुंबईतील पुलाखाली आकर्षक रंगरंगोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील पुलाखाली आकर्षक रंगरंगोटी
मुंबईतील पुलाखाली आकर्षक रंगरंगोटी

मुंबईतील पुलाखाली आकर्षक रंगरंगोटी

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : मुंबईतील उड्डाण पूल आणि पादचारी पुलांखाली मुंबई महापालिकेने रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी मुंबईतील ३२ उड्डाण पुलांची निवड करण्यात आली आहे. महापालिका यासाठी कोट्यवधी रुपये मोजणार आहे. मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्याचा हा प्रयत्न आहे. 
मुंबईतील उड्डाण पूल व पादचारी पुलांखाली रंगरंगोटी करून त्यांना आकर्षक लूक देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. उड्डाण पुलाखालील जागेचे सुशोभीकरण व रंगरंगोटी करून त्यावर चित्रे रेखाटली जाणार आहेत. यासाठी तब्बल ३२ पुलांची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी चार कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबई महापालिकेतर्फे शहर आणि उपनगरात अनेक उड्डाण पूल व पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांवरून वाहतूक, रहदारी सुरू झाल्यानंतर या पुलांची अवस्था खराब होते. या पुलांखालील भाग अधिकाधिक आकर्षक व्हावा व त्यांच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी पुलांखालील पिलर, भिंती रंगवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये भित्तीचित्रेही काढण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पालिकेच्या अखत्यारीतील ३२ उड्डाण पुलांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
पुलांच्या रंगरंगोटीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुलांचे रंगकाम करून भिंती, पिलरच्या ठिकाणी झाडे, फुले व अन्य नक्षीकाम, चित्रे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे पुलांखालील सौंदर्यात वाढ होणार आहे. पावसाळ्यानंतर रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात येणार आहे. १८ महिन्यांत या पुलांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले.
...
या पुलांचा समावेश
प्रिन्सेस स्ट्रीट, मरिन ड्राईव्ह, केम्स कॉर्नर, प्रियदर्शनी, फ्रेंच पूल, ऑपेरा हाऊस, ग्रँट रोड पूल, केनडी पूल, सीताराम सिलम (वाय पूल), रे रोड पूल, सायन रुग्णालय, करी रोड, केशवसुत (दादर), महालक्ष्मी पूल, कॅरोल एल्फिन्स्टन, लोअर परेल आदी पुलांसह अन्य उड्डाण पूल व पादचारी पुलांचा समावेश आहे.
...
शहराच्या सौंदर्यीकरणाच्या अनुषंगाने तसेच शहर सुंदर दिसावे यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातून प्रवास करताना नागरिकांना चांगला अनुभव मिळावा हा उद्देश आहे. 
- आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87122 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..