पालिकेचे ऑनलाईन देयक भरताना अडचण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेचे ऑनलाईन देयक भरताना अडचण
पालिकेचे ऑनलाईन देयक भरताना अडचण

पालिकेचे ऑनलाईन देयक भरताना अडचण

sakal_logo
By

वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने मालमत्ताकरावर ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी क्‍यूआर कोड छापला आहे, मात्र क्‍यूआर कोडच्या माध्यमातून फक्त पेटीएमद्वारेच रक्कम भरली जात आहे. शिवाय पेटीएमने पैसे भरल्यानंतर कोणताही मेसेज येत नसल्‍याने पैसे जमा झाले की नाही, हे ग्राहकांना कळत नाही. तसेच गुगल पे, फोन पे या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन रक्कम भरण्याचा प्रयत्न केला असता, रक्कम भरण्यास अडचण येत असल्‍याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सरकारकडून रोख व्यवहारापेक्षा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी नागरिकांना प्रोत्‍साहन दिले जात आहे. नवी मुंबईत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मात्र मालमत्ता कर तसेच पाणी देयक भरण्यासाठी विभाग कार्यालयामध्ये रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. फोनपेवर तर नवी मुंबई महापालिकेचे ऑनलाईनमध्ये प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी नावच दाखवण्यात येत नाही.
पाणी देयक हे दर दोन महिन्यांनी येते. ते भरण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये रांग लावावी लागते. पाणी देयकांचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्‍ध केल्‍यास, वेळ वाचेल तसेच त्रासही कमी होईल, असे नागरिकांचे म्‍हणणे आहे.
पालिकेकडून फक्त मालमत्ताकरावर क्‍यूआर कोड टाकण्यात येतो. तोच कोड पाणी देयकांवर दिल्‍यास, नागरिकांना विभाग कार्यालयामध्ये खेटे मारावे लागणार नाही. पाणी देयक किंवा मालमत्ता कराची देयके घरपोच देण्यास विलंब झाल्‍यास, नागरिकांना दंड भरावा लागतो. ई-मेल वरूनही मालमत्ता व पाणी देयक मिळाल्‍यास नागरिकांची गैरसोय टळेल, असे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

महापालिकेचा मालमत्ता कर हा गुगल पे, फोन पे वर देखील ऑनलाईन पद्धतीने पैसे भरता यावे, यासाठी देखील सोय करता येते का, यांची पडताळणी करता येईल. तर पाणी देयक देखील ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा लवकरच उपलब्‍ध करून देण्यात येईल.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका


नवी मुंबई महापालिकेमध्ये अजूनही जुन्या पद्धतीने काम चालते. आता अधिकाधिक काम ऑनलाईन पद्धतीने होणे अपेक्षित आहे. मालमत्ता देयक व पाणी देयक हे ई -मेल ने दिले पाहिजे. ऑनलाईन पैसे भरल्यानंतर त्यांचा मेसेज ग्राहकांना मिळाला पाहिजे.
- रवींद्र औटी, नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87155 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top