एमजेपी जलवाहिनीतून करंजाडेला पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमजेपी जलवाहिनीतून करंजाडेला पाणीपुरवठा
एमजेपी जलवाहिनीतून करंजाडेला पाणीपुरवठा

एमजेपी जलवाहिनीतून करंजाडेला पाणीपुरवठा

sakal_logo
By

पनवेल, ता. २९ (बातमीदार) : करंजाडे परिसराला मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असल्याने टंचाई भासत आहे. येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सिडको अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी एमजेपी जलवाहिनीतून लवकरच करंजाडेला पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

करंजाडे परिसराला १५ एमएलडी मागणीच्या तुलनेत ५० टक्के पाणीपुरवठा होत आहे. सद्यःस्थितीत सरासरी सात ते आठ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले. एमजेपी व सिडकोच्या समन्वयातून १५ एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सेक्टर सहामधील उंचावर असलेल्या सोसायट्यांना पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी मान्य केले. लवकरच सिडको सहव्यवस्थापकीय संचालक, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यासह उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भाजप मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (ता. २७) झालेल्या या बैठकीला भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, सिडको पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चौथानी, पाणीपुरवठा अभियंता जगदाळे यांच्यासह भाजप वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, मिरेंद्र शहारे, वैशाली जगदाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87161 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..