विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कायदेविषयक शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कायदेविषयक शिबिर
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कायदेविषयक शिबिर

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कायदेविषयक शिबिर

sakal_logo
By

घणसोली (बातमीदार) : घणसोली विभागातील महाराष्ट्र सैनिक व ‘वी ॲण्ड अस फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शनपर उपक्रम राबवण्यात येणार आहे. ३ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने हे शिबिर पार पडणार आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास कोणाकडे दाद मागावी व फसवणूक होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, तसेच ग्राहकांचे अधिकार याबाबत व सायबर क्राईम म्हणजे काय, कशाप्रकारे फसवणूक केली जाते, आर्थिक फसवणूक झाल्यास कोणाकडे दाद मागावी, तसेच फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रकांत येशीराव व औरंगाबाद खंडपीठातील ॲड. चैतन्य भंडारी हे प्रमुख अतिथी ग्राहक संरक्षण कायदा व सायबर क्राईम लॉ याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87166 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..