
ऑपरेशन ऑल आउटमध्ये २० आरोपींना अटक
पालघर, ता. २८ (बातमीदार) ः पालघर पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये २० आरोपींना अटक करण्यात आली; तर दारूबंदी कायद्याप्रमाणे २८ गुन्हे दाखल करण्यात आले. हे ऑपरेशन पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
ऑपरेशन ऑल आऊटमध्ये नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, ॲक्शन टीम, हंटर टीमद्वारे कारवाई करण्यात आली. या वेळी ५३ पोलिस अधिकारी व ३१९ पोलिस अमलदारांनी २० तास १६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३२ ठिकाणी नाकाबंदी; तर २० ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान आठ वॉरंट व ५१ समन्सची बजावणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये २८ गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये तीन जणांवर कारवाई करण्यात आली; तर मोटर वाहन कायद्यान्वये १८० वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ७० हजार ९५० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87170 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..