ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाईचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाईचे संकट
ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाईचे संकट

ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाईचे संकट

sakal_logo
By

वाशी, ता. २८ (बातमीदार) : पाणीदार अशी ओळख असणाऱ्या तुर्भे स्टोअर आणि सभोवतालच्या क्षेत्रात महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे जनतेला पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे १ जुलै रोजी तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, हनुमान नगर आणि सभोवतालच्या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंबंधात दिलासा देण्यासाठी बेलापूर येथील महापालिका प्रशासकीय मुख्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढणार असल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले.

तुर्भे विभागातील पॅनल क्र. २३ व २४ अंतर्गत येणाऱ्या नागरी वसाहतीमधील नागरिक गेल्या एक वर्षाहून अधिक कालावधीपासून पाणीटंचाई व पाणीकपातीसारख्या समस्येपासून त्रस्त आहे. या भागात बहुतांश श्रमिक वर्ग वास्तव्य करतो. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी आवश्यक मुबलक पाणीपुरवठा महापालिकेच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे; मात्र महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या ढिसाळ पाणी नियोजन कारभाराचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे कॉलनी विभागात प्रमाणापेक्षा अधिक पाणीपुरवठा करायचा आणि झोपडपट्टी, श्रमिक वसाहतीत पाणी कपात करून गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा, ही बाब महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाला अशोभनीय असल्याचे मत सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87171 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top