
पहाट झाली तरी डान्सबारचे दार उघडेच
वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये अनेक ठिकाणी डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार, पब या नावाने सकाळी ५ वाजेपर्यंत बेकायदा धंदे सुरू आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री कार्यालय व संबंधित पोलिस कार्यालयाला तक्रार देऊनही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. पहाटेपर्यंत बिनधोकपणे सुरू असणाऱ्या डान्स बारवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे पदाधिकारी अॅड. बापू पोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली.
शहरातील डान्स बार प्रकरणात स्थानिक पातळीवर पोलिसांत तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. सदर प्रकाराचा छडा लावण्यासाठी आणि सदर बेकायदा व्यवसायाचे पुरावे जमा करण्यात आले आहेत. सदर प्रकरणात अनेकांकडून त्रास दिला जात आहे. पोलिस कंट्रोलला तक्रार केल्यावर पोलिसांमार्फत बेकायदा धंदे बंद न करता त्या ठिकाणी येऊन साटेलोटे होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे बापू पोळ यांनी पत्रात म्हटले. यापूर्वीही अनेक वेळा तक्रार अर्ज दिलेले आहेत; मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने १७ जानेवारी २०१८ रोजी मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच मुख्यमंत्री सचिवालय, शासकीय कार्यालयात अनेक तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणतीच कारवाई होत नसल्याने आता मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावले असल्याचे अॅड. पोळ यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87173 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..