
उधवा–सायवन–कासा रस्ता धोकादायक
कासा, ता. २८ (बातमीदार) ः दादरा नगर हवेली केंद्रशासकीय प्रदेशातील खानवेल, सेलवास येथून जंगलातील रस्ता सायवनमार्गे कासा येथे निघतो. तेथून मुंबई, नाशिक, ठाणे येथे जाता येते. गुजरातहून राष्ट्रीय महामार्गाहून अनेक अवजड वाहने जकात चुकवण्यासाठी आडमार्गाने धुंदलवाडी-उधवा, सायवन किंवा तलासरी-उधवा-सायवन-कासा या जंगलातील राज्यमार्गाने जात असतात. त्यामुळे धुंदलवाडी ते उधवा या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत; तर उधवा-सायवन-कासा या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करीत असतात, त्यामुळे येथील अनेक ठिकाणी अपघात होत असतात.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी पहिल्याच पावसानंतर मोठे खड्डे पडले असून या मार्गावरून जाताना खड्ड्यांमुळे एक ते सव्वा तासाचा वेळ लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघात होत आहेत. अनेक जण या खड्ड्यांमुळे जखमी झाले आहेत; तर काही वाहने जकात चुकवून पोलिस प्रशासनाच्या भीतीने भरधाव वेगात जात असताना अपघातग्रस्त होऊन रस्त्याच्या खाली कोसळतात. यामुळे स्थानिक दुचाकीस्वार, प्रवासी वाहनांचे अपघात होऊन नाहक बळीसुद्धा गेलेले आहेत. प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ करत आहेत.
या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. जकात चोरी, दारूची चोरटी वाहतूक याच मार्गाने होत असते. त्यामुळे भरधाव वाहने चालवताना अपघात होत असतात. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
- अभिजित चव्हाण, नागरिक, चारोटी
भरधाव वेगात जाणारा कंटेनर शेतात कोसळून अपघातग्रस्त
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87183 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..