वरळीच्या अभ्यासगल्लीचे सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीच्या अभ्यासगल्लीचे सुशोभीकरण
वरळीच्या अभ्यासगल्लीचे सुशोभीकरण

वरळीच्या अभ्यासगल्लीचे सुशोभीकरण

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. २८ (बातमीदार) : वरळीच्या अभ्यास गल्लीत शेकडो मुले अभ्यासासाठी येत असतात. अभ्यास करताना विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी, त्यासाठी परिसर प्रफूल्लित राहावा यासाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. अभ्यास गल्लीची रंगरंगोटी करण्यात आली असून परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.
वरळी येथील अभ्यास गल्लीत अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. ही अभ्यास गल्ली म्हणजे त्यांच्याकरिता हक्काचे अभ्यास घर आहे. याच अभ्यास गल्लीत अभ्यास करून अनेक जण आज उच्पदस्थ झाले आहेत.
आता या अभ्यास गल्लीतील भिंतींना रंग काढण्यात आला असून शिक्षणाची जनजागृती करणारी सुंदर भित्तीचित्र रेखाटण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना संध्याकाळच्या वेळेस अभ्यास नीट करता यावा यासाठी दिवेही बसवण्यात आले आहेत. शिवाय बसण्यासाठी जागादेखील करण्यात आली आहे. पूर्वी याच ठिकाणी कचऱ्यामुळे परिसर बकाल झाला होता. काही मद्यपिदेखील या ठिकाणी बसत होते; मात्र आता परिसर स्वच्छ ठेवण्यात येत आहे. ही अभ्यास गल्ली घरे छोटी असणाऱ्यांसाठी तर एक वरदान आहे. शिवाय एकत्र येऊन अभ्यासावर चर्चाही केल्या जातात. अनेक वर्षे मुले असुविधांचा सामना करत येथे अभ्यास करत होती. आता सुविधा आणि स्वच्छता उपलब्ध झाल्याने मुले अधिक जोमाने अभ्यास करतील, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87188 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..