बदलापूर पालिका अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूर पालिका अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश
बदलापूर पालिका अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

बदलापूर पालिका अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

sakal_logo
By

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : शहरात अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अमित सरमळकर या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश पालिकेला देण्‍यात आले आहेत. मात्र, पालिका या अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केला आहे.

शहरातील अनधिकृत फेरीवाले हटवणे व शहर फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याचे काम अतिक्रमण विभागाकडे असतानाही शहरातील अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधिकारी अमित सरमळकर या फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करतात, तर गोरगरीब आदिवासी महिलांना त्यांचा माल विक्री करायला देत नाहीत. त्यांना त्रास देतात, असे आरोप देशमुख यांनी केले आहेत. या संदर्भातील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्या आधारे मुजोर अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्‍यावर योग्य ती कारवाई करावी याकरिता अविनाश देशमुख यांनी, राज्य सरकारकडे विनंती अर्ज केला असता या अर्जाची दखल घेत, नगरविकास विभाग महाराष्ट्र सरकारकडून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला या संदर्भातील पत्र देण्यात आले आहे. दरम्‍यान, यासंदर्भात देशमुख यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
----------------------------------------
कोट
सरकारकडून चौकशी संदर्भातील पत्र अद्याप पालिकेला प्राप्त झाले नसून, पत्र मिळाल्‍यानंतर सरकारच्या आदेशाची पूर्तता नक्की केली जाईल.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, बदलापूर नगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87190 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..