खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट बससेवा सुरू करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट बससेवा सुरू करावी
खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट बससेवा सुरू करावी

खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट बससेवा सुरू करावी

sakal_logo
By

खारघर (बातमीदार) : बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते वाशीदरम्यान बस सुरू आहे. त्याच धर्तीवर मुंबई विमानतळ ते खारघरदरम्यान बेस्ट बस सुरू करावी, असे निवेदन खारघर भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल यांच्याकडे केली आहे. बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते वाशी डेपोदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचे प्रवास भाडे दीडशे रुपये आहे. वाशी, नवी मुंबईप्रमाणे खारघरमधील नागरिकांची देश-विदेशात नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबई विमानतळावरून ऑनलाईन टॅक्सी सेवा अधिक पटीने दर आकारतात. बेस्ट बस सेवा सुरू झाल्यास रहिवाशांसाठी अधिक सोयीचे होईल. त्यामुळे मुंबई विमानतळ ते खारघरदरम्यान बेस्ट बससेवा सुरू करावी, असे निवेदन महापौर कविता चौतमल आणि पालिका आयुक्तांना दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87199 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..