आधार प्रतिष्ठानचे शिंदेंना समर्थन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधार प्रतिष्ठानचे शिंदेंना समर्थन
आधार प्रतिष्ठानचे शिंदेंना समर्थन

आधार प्रतिष्ठानचे शिंदेंना समर्थन

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) ः येथील आधार प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. किणीकर सर्वांच्या सुखदुःखात धावून येतात. त्यामुळे आधार प्रतिष्ठान त्यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे संदीप डोंगरे यांनी सांगितले.

आधार प्रतिष्ठानने आमदार किणीकरांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर प्रचार मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. सुभाष टेकडी परिसर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. आधारचे संदीप डोंगरे हे डॉ. बालाजी किणीकर यांचे खंदे समर्थक आहेत. डॉ. किणीकर यांच्या निवडणूक प्रचारातही डोंगरे यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या माजी महापौर लीलाबाई आशान व उपशहरप्रमुख माजी नगरसेवक अरुण आशान, माजी स्थायी समिती सभापती विजय पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87218 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..