पोलिस असल्याची बतावणी करत दागिने लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस असल्याची बतावणी करत दागिने लुटले
पोलिस असल्याची बतावणी करत दागिने लुटले

पोलिस असल्याची बतावणी करत दागिने लुटले

sakal_logo
By

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) ः भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातील नारपोली व कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावर तोतया पोलिसांकडून लुटीच्या घटना घडत आहेत. विशेष करून महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याचे प्रकार घडत आहेत. भिवंडी तालुक्यातील मानकोली गावाजवळ राहणाऱ्या एका महिलेच्या अंगावरील सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील मानकोली रोड येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका मनीषा मंगेश खातू (वय ५८) या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून मंगळवारी (ता. २८) सकाळी भिवंडी येथील बँकेत निवृत्तिवेतनाची चौकशी करण्यासाठी निघाल्या होत्या. त्या राजनोली बायपास रस्त्यावरील टाटा आमंत्रा येथे पोहचल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवून पोलिस असल्याची बतावणी केली. पुढे चोरी झाल्याचे सांगून तुमचे दागिने काढून ठेवा असे त्यांनी सांगितले. त्या वेळी आणखी दोघा जणांना आम्ही दागिने काढून दिल्याचे सांगितल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यामुळे महिलेने आपल्या हातातील एक लाख २० हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या. तोतया पोलिसांनी महिलेच्या हाती बनावट बांगड्या असलेली कागदी पुडी देऊन पोबारा केला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षिका खातू यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित पाटील करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87232 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..