रेल्वे भाड्यात सवलतीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे भाड्यात सवलतीची मागणी
रेल्वे भाड्यात सवलतीची मागणी

रेल्वे भाड्यात सवलतीची मागणी

sakal_logo
By

मुरबाड, ता. २९ (बातमीदार) ः ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात मिळणारी सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मुरबाडमधील ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांनाही पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कोरोना रोगाची साथ सुरू होण्यापूर्वी साठ वर्षांच्या वरील पुरुषांना रेल्वे भाड्यात ४० टक्के; तर ५८ वर्षांवरील महिलांना ५० टक्के सूट दिली जात होती, परंतु कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत रेल्वे मंत्रालयाने बंद केली आहे. तसेच त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले होते. आता लॉकडाऊन उघडल्याने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी निर्बंध कमी करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी अनुमती मिळाली असली तरी त्यांना रेल्वे भाड्यात मिळणारी सवलत पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मुरबाडमधील ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87234 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top