एकनाथ शिंदे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ  शिंदे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
एकनाथ शिंदे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

एकनाथ शिंदे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार ) ः बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अंबरनाथला मंगळवारी शिंदे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे अंबरनाथ शिवसेनेत फुट पडल्याचे चित्र पहावयाला मिळाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किणीकर, तसेच आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ या वेळी घोषणा दिल्या गेल्या.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आमदार डॉ. बालाजी किणीकरदेखील त्यांच्यासमवेत गुवाहाटीला रवाना झाले होते. आमदार डॉ. किणीकर यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये फलक लावण्यात आले होते. अंबरनाथ शहरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने शहरात विकास कामे झाली आहेत. महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडण्याची एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. मागणीला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शिवसेना आमदारांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळाले असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि सुभाष साळुंके यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, रवी करंजुले, रविंद्र पाटील, तुळशीराम चौधरी, उमेश गुंजाळ, गणेश कोतेकर, संदीप लोटे उत्तर भारतीय आघाडीप्रमुख प्रमोद चौबे, ज्ञानधर मिश्रा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87251 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..