
नवी मुंबई पालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई
बेलापूर (बातमीदार) : नेरूळ परिसरात बेकायदा फेरीवाले ठिकठिकाणी बसलेले असतात. त्यांची संख्या वाढत असून, नोडमधील चौक, रस्त्यावर, रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. या फेरीवाल्यांकडून खरेदी करण्यासाठी नागरिकांचीदेखील गर्दी वाढत असल्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना त्रासाचा सामना होत होता. या फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे कारवाई मोहीम राबवली जाते; परंतु काही वेळात फेरीवाले आपले बस्तान पुन्हा मांडतात. सोमवारी महापालिकेच्या नेरूळ विभागाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून राजीव गांधी उड्डाण पुलाखाली सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. त्यामुळे सोमवारी उड्डाणपुलाखाली परिसर फेरीवालामुक्त झाला होता. फेरीवाल्यांनी बस्तान न मांडल्यामुळे तिथला परिसर मोकळा झाला होता. महापालिकेच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, नेरूळमध्ये सर्वच ठिकाणी अशा मोहीम राबवून अधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी केली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87275 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..