उटावली येथे शेती कार्याशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उटावली येथे शेती कार्याशाळा
उटावली येथे शेती कार्याशाळा

उटावली येथे शेती कार्याशाळा

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २९ (बातमीदार) ः उटावली-भानपूर येथे कृषी संजीवनी व शेती शाळा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास जि. प. सदस्य संदीप पावडे यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे बी. एस. पाटील, मंडळ कृषी अधिकारी निपुर्ते, पर्यवेक्षक सूर्यवंशी, कृषी सहायक पी. एस. सांबर यांनी देखील मार्गदर्शन केले.

२५ जून ते १ जुलैपर्यंत कृषी संजीवनी मोहीम राबविली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे, उत्पादन वाढ, पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाअंतर्गत तंत्रज्ञान सक्षमीकरण, खत बचत इत्यादी कार्यक्रम या वेळी घेण्यात आले. या वेळी फुलशेती व्यवसायास जास्तीत जास्त वाव द्यावा, असे सांगण्यात आले. या शेती कार्यशाळेकरीता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87280 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top