ठाण्यात सात गाड्यांवर दोन झाडे कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात सात गाड्यांवर दोन झाडे कोसळली
ठाण्यात सात गाड्यांवर दोन झाडे कोसळली

ठाण्यात सात गाड्यांवर दोन झाडे कोसळली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : कळवा, पारसिक नगर येथील ओझोन व्हॅली बिल्डींग नंबर १ सोसायटीच्या आवारातील दोन झाडे पार्क केलेल्या १ चारचाकी आणि सहा दुचाकी वाहनांवर कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या समोर आली. या घटनेत जरी कोणालाही दुखापत झाली नसली तरी त्यामध्ये सातही गाड्यांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी टोरंट कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. गाड्यांवर पडलेली झाडे कापून एका बाजूला केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
.........
ठाण्यात संरक्षण भिंत कोसळून एक जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : पाचपाखाडी, सर्विस रोड येथील पारेख गॅरेजच्या मागील अहिरे चाळीची अंदाजे ३० फूट लांबी व ५ फूट उंचीची सुरक्षा भिंत चारचाकीवर पडल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत भगवान मस्के (५२) यांच्या पायाला दुखापत झाली; तर उर्वरित भिंतीचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आहे. पडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, उथळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एकाला दुखापत झाली आहे, तर या महिन्यात मुलुंड टोलनाक्‍याच्या अगोदर असलेल्या मॉडेला कंपनीची अंदाजे ५० फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87287 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..