जरंडी नदीवरील पूल धोकादायक स्‍थितीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जरंडी नदीवरील पूल धोकादायक स्‍थितीत
जरंडी नदीवरील पूल धोकादायक स्‍थितीत

जरंडी नदीवरील पूल धोकादायक स्‍थितीत

sakal_logo
By

खर्डी, ता. २९ : गतवर्षी अतिमुसळधार पावसाने खर्डी विभागातील जरंडी नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्याने पुलाच्या संरक्षणासाठी असलेले लोखंडी पाईप वाहून पुलाला अडकले आहेत. पुलावरील रस्ताही खचला असून, त्याचा काही भाग वाहून गेल्याने पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. या घटनेला वर्ष उलटले मात्र, याबाबत ग्रामपंचायतीमार्फत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दुरुस्ती केलेली नाही.
या पुलावरील संरक्षणासाठी असलेल्या लोखंडी पाईपची दुरुस्ती करून येथे संरक्षक भिंत बांधावी, वाहून गेलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी व येथील रस्त्यावर पडलेल्या भगदाडाची तात्पुरती दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली. मात्र, अद्याप या पुलाची दुरुस्ती न झाल्याने येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. जरंडी तळेखण जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने कामावर जाणारे चाकरमानी, शाळेत जाणारे विद्यार्थी, दुधाचा व्यापार करणारे तसेच गावातील नागरिक याच रस्त्याचा वापर करीत असल्याने मोठा धोका उदभवू शकतो.
-------------------------------------------------
वाहनचालकांमध्‍ये संताप
जरंडी नदीवरील पूल कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने येथील जनसंपर्क तुटण्याची शक्यता आहे. यामुळे जरंडी, तळेखण या गावांकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

कोट

पुलाच्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिले होते. मात्र, अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे येथे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
- अशोक वीर, माजी सरपंच, धामणी ग्रुपग्रामपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87289 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..