ऐरोलीतील श्रीराम शाळेच्या विरोधात संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोलीतील श्रीराम शाळेच्या विरोधात संताप
ऐरोलीतील श्रीराम शाळेच्या विरोधात संताप

ऐरोलीतील श्रीराम शाळेच्या विरोधात संताप

sakal_logo
By

वाशी, ता. २९ (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर तीनमधील श्रीराम विद्यालयामध्ये मराठी माध्यमांतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवारी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हळदणकर व माजी नगरसेवक राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम विद्यालय शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत ठिय्या मांडला होता. आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने ऐरोली सेक्टर तीनमधील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असून त्‍याव्यतिरिक्‍त अन्य ठिकाणच्या मुलांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे हळदणकर यांनी दिली.
श्रीराम विद्यालयात मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. याविरोधात पंधरा दिवसांपासून शिवसेनेचे स्थानिक नेते मनोज हळदणकर यांनी शाळा प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. शाळा सुरू होऊन जवळपास दोन आठवडे झाले आहे, तरीही मुलांना प्रवेश दिला नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
पालकांच्या उद्रेकानंतर शाळेने पहिलीच्या स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे, पण त्याव्यतिरिक्त बाहेरील मुलांना प्रवेश देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. मराठी माध्यमांच्या दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात येत नाही.

ऐरोलीतील श्रीराम विद्यालयात सीबीएसई व इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम अशा तिन्ही शाळा चालवण्यात येत आहेत, पण त्यांनी मराठी माध्यम बंद करण्याचा घाट घालत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहे. आंदोलनानंतर पहिलीच्या स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे, पण बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नसल्याचे स्‍पष्‍ट केले. त्यामुळे शाळेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
- मनोज हळदणकर, माजी नगरसेवक

मराठी माध्यमांच्या शाळेत स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे, तर आजूबाजुच्या परिसरात चांगल्या शाळा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिशन घ्यावे. हे आंदोलन फक्त राजकीय स्टंटबाजी आहे. दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पालकांची काही अडचण असल्यास त्यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधावा.
- धनश्री आंगणे, व्यवस्थापक, श्रीराम विद्यालय

मराठी माध्यमाच्या शाळेत पहिला मुलगा पाचवीला शिकत आहे. दुसऱ्या मुलाला प्रवेश घ्‍यायचा आहे, मात्र शाळा प्रवेश नाकारत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्‍यामुळे स्‍कूल बसचा खर्च वाढणार असल्‍याचे एका पालकाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87291 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top