रायगडमध्ये कौशल्य विकासाचा बोजवारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये कौशल्य विकासाचा बोजवारा
रायगडमध्ये कौशल्य विकासाचा बोजवारा

रायगडमध्ये कौशल्य विकासाचा बोजवारा

sakal_logo
By

श्रीवर्धन, ता. २९ (बातमीदार)ः कौशल्यावर आधारित प्रशिक्षण हा औद्योगिक रोजगार व स्वयंरोजगाराचा पाया असतो. स्टील, जहाजबांधणी, ऊर्जा तसेच रायगडच्या लगत वसलेल्या मुंबई, ठाणे व पुणे या महानगरांत आयटीआय प्रशिक्षितांना मोठी रोजगार संधी उपलब्ध आहे.
मात्र जिल्ह्यातील पनवेल व उरण शहरातील आयटीआय वगळता उरलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व आयटीआयमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणारे निर्देशक, प्राचार्य व अन्य कर्मचाऱ्‍‌यांची अनेक पदे रिक्त आहेत.
दरवर्षी शासनाच्या बदली धोरणानुसार, अवघड व बिगर अवघड क्षेत्रात समतोल रहावा, अशा पद्धतीने बदल्या केल्या जाव्यात, असा नियम आहे; परंतु चुकीचे निकष लावून दुर्गम भागाचा बिगर अवघड क्षेत्रात समावेश करून चुकीच्या पद्धतीने पदांचा समतोल दाखवून पदे रिक्त ठेवली जात आहेत. कर्मचाऱ्‍‌यांची नियुक्‍ती केली तरी हजर होण्याआधीच त्‍यांची बदली केली जाते. यामुळे येथील विद्यार्थी तज्‍ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनापासून वंचित राहत आहेत; तर ठिकाणी तासिका अप्रशिक्षित तत्त्वावरील निर्देशकांकडून घेतला जात आहे.
गेल्‍या पाच वर्षांत श्रीवर्धन, म्हसळा, नांदवी आयटीआयमध्ये नियतकालिक बदलीने दिलेल्या जवळपास सर्व निर्देशकांच्या बदल्या व्यवसाय प्रशिक्षणाच्या प्रादेशिक सहसंचालकांनी फिरवून दिल्‍या आहेत.

मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मुंबई शहर, उपनगरे, अंबरनाथ, पनवेलपर्यंत २४ टक्‍के घरभाडे भत्ता मिळतो. उर्वरित सर्व कोकणात केवळ ८ टक्‍के घरभाडे भत्ता मिळतो. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील मासिक पगारात १० ते १५ हजार रुपये इतकी मोठी तफावत आहे. जास्त पगाराच्या प्रलोभनाने आर्थिक देवाणघेवाण करून मुंबई शहरात कर्मचारी एकवटले जात आहेत व ग्रामीण भागात तज्‍ज्ञ निर्देशकांची वानवा आहे.

कायम शहरात शासकीय नोकरी केलेल्या प्रत्येकाला सक्तीने किमान ६ वर्षे ग्रामीण भागात सेवा करायला लावून अवघड बिगर अवघडचे वर्गीकरण योग्य निकषा आधारे करणे हे यासाठी अत्यावश्यक आहे. सध्या आमच्याकडे किमान ५० टक्के पदे रिक्त आहेत. माझ्याकडे तीन आयटीआयचा अतिरिक्त पदभार आहे. नुकतीच वर्ग तीनचे कर्मचारी पदोन्नती होऊन वर्ग दोनचे कर्मचारी बनले आहेत. मात्र वर्ग तीनच्या अनेक जागा रिक्त आहेत. शासनस्तरावर पदभरती होण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
- एस. पी. बोरसे, प्राचार्य, आयटीआय श्रीवर्धन

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87294 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..