
महेंद्र पवार यांची धडपड वाखाणण्यासारखी - ठाकूर
वसई, ता. २९ (बातमीदार) ः निवृत्त झाल्यावर आपले छंद जोपासण्यास वेळ मिळतो. नव्या जीवनाची सुरुवात होते. त्याचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार आनंद ठाकूर यांनी केले. कलाशिक्षक महेंद्र पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी पवार यांच्या कामगिरीचाही गौरव केला.
या वेळी ठाकूर म्हणाले, आदिवासी भागातील विद्यार्थी कलेपासून वंचित राहू नये यासाठी कलाशिक्षक महेंद्र पवार यांनी केलेली धडपड वाखाणण्यासारखी आहे.
कलाशिक्षक महेंद्र पवार ३३ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त भिसे विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक भरत ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. शाळेसाठी खर्च भागवताना येणारी आर्थिक अडचण लक्षात घेत महेंद्र पवार यांनी शाळेला ५० हजार रुपये देगणीचा धनादेश शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. या सत्कार समारंभाप्रसंगी सचिव आप्पासाहेब भोये, खजिनदार राजेंद्र पागधरे, सदस्य शैलेश राऊत, मुख्याध्यापक भरत ठाकूर, पर्यवेक्षिका अनघा गायकवाड, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87319 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..