नाईक नगर सोसायटीतील इतर इमारतींवरही हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईक नगर सोसायटीतील इतर इमारतींवरही हातोडा
नाईक नगर सोसायटीतील इतर इमारतींवरही हातोडा

नाईक नगर सोसायटीतील इतर इमारतींवरही हातोडा

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : कुर्ला येथील नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळून मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. नाईक नगर सोसायटीत चार इमारती आहेत. दुर्घटनेनंतर आता परिसरातील आणखी काही इमारतींवर कारवाई करण्याचे संकेत मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. इतर इमारतीही जमीनदोस्त करण्यासाठी विभाग पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

सोसायटी परिसरातील इतर तीन इमारतीही धोकादायक स्थितीत असल्याचे आढळले आहे. म्हणूनच त्या जमीनदोस्त करण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुर्ला एल वॉर्डचे सहायक आयुक्त महादेव शिंदे यांनी दिली. उर्वरित तीन विंग रिकाम्या करून जमीनदोस्त करण्यासाठी कंत्राट दिले जाईल. त्यामुळे लवकरच तिन्ही इमारती पाडण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच या इमारतींवरही हातोडा पडणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87350 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..