अमली पदार्थासह तिघे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमली पदार्थासह तिघे अटकेत
अमली पदार्थासह तिघे अटकेत

अमली पदार्थासह तिघे अटकेत

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २९ (बातमीदार) ः अमली पदार्थविरोधी पथकाने शीव-पनवेल महामार्गावर मानखुर्दलगत लाखोंच्या अमली पदार्थांच्या साठ्यासह मंगळवारी (ता. २८) सायंकाळी दोघांना अटक केली. फ्रान्सिस डिसोझा (वय ३०) व अशफाक शेख (वय २४) अशी त्यांची नावे आहेत.
फ्रान्सिस हा सराईत गुन्हेगार असून तळोजा येथील रहिवासी आहे; तर अशफाक हा गोवंडीच्या शिवाजीनगरचा रहिवासी आहे. दोघांकडून सुमारे ३० लाख रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. फ्रान्सिसकडे १५४ ग्रॅम; तर अशफाककडे ४५ ग्रॅम एमडी सापडले. या १९९ ग्रॅम एमडीची किंमत ३० लाख रुपये इतकी आहे. फ्रान्सिसला याआधीदेखील अशाच अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. दुसऱ्या कारवाईत आझाद मैदान युनिटच्या पथकाने माझगावच्या बीपीटी वसाहत परिसरातून सलाम शेख (वय ३९) याला ५६ ग्रॅम एमडीसह अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87353 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top