डोक्यात दगडी पाटा टाकून मित्राकडून मित्राची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोक्यात दगडी पाटा टाकून मित्राकडून मित्राची हत्या
डोक्यात दगडी पाटा टाकून मित्राकडून मित्राची हत्या

डोक्यात दगडी पाटा टाकून मित्राकडून मित्राची हत्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : बोनसारी गावातील डी. आर. पाटील क्वारी परिसरातील अमोल साळवे (वय २१) या तरुणाच्या डोक्यात त्याच्याच मित्राने दगडी पाटा टाकून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी समोर आले. राजेश वाघमारे असे या घटनेतील आरोपीचे नाव असून त्याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अमोल हा आरोपी राजेश यांच्या भाचीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संतापाने राजेशने अमोलची हत्या केल्याचे तपासात आढळले.

गेल्या दिवस दिवसांपासून अमोल यांची आई त्यांच्या मूळ गावी गेल्याने अमोल घरी एकच होता. त्यामुळे अमोलचा मित्र राजेश त्याच्या घरी राहायला आला होता. हे दोघे तेथे नशापाणीही करत होते; मात्र अमोल आपल्या भाचीच्या मागे लागल्याचे राजेशला समजल्यावर बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या अमोलच्या डोक्यात दगडी पाटा घालत राजेशने अमोलला ठार मारले. या घटनेची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अमोलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी राजेश वाघमारे याला या हत्येप्रकरणी अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87367 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..