माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना बुधवारी सकाळी जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. पेडणेकर यांच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी पत्रात देण्यात आली आहे. दरम्यान, धमकीनंतर पेडणेकर यांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

किशोरी पेडणेकर यांच्या लोअर परळमधील घराच्या पत्त्यावर धमकीचे पत्र पाठवण्यात आले. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात विजय म्हात्रे नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली असून पोलिसांनी कलम ५०९, ५०६ (२), भादंविअन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्रात असभ्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. ‘नवीन सरकार सत्तेवर आल्यावर किशोरी पेडणेकर यांना त्यांच्या कुटुबीयांसह जीवे मारले जाईल’ असा धमकीवजा इशारा पत्रात देण्यात आला आहे. धमकीचे पत्र उरणहून विजेंद्र म्हात्रे व्यक्तीच्या नावे पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२१ मध्येही किशोरी पेडणेकर यांना याच आरोपीने धमकीचे पत्र पाठवले होते. धमकीनंतर पेडणेकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली असून पत्र पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. दोषी व्यक्तीस कठोर शिक्षा होईल, असे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87378 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..