कचरा वर्गीकरण न करणार्या सोसायट्यांना दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा वर्गीकरण न करणार्या सोसायट्यांना दणका
कचरा वर्गीकरण न करणार्या सोसायट्यांना दणका

कचरा वर्गीकरण न करणार्या सोसायट्यांना दणका

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) : महापालिका हद्दीतील अनेक सोसायट्यांनी कचरा वर्गीकरण करण्याचे थांबवले आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांना दणका देत कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांचा कचरा न उचलण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२२ मध्ये देशात प्रथम क्रमांक काढण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंबर कसली आहे; पण स्वच्छ भारत सर्व्हेक्षणाची टीम पाहणी करून गेल्यानंतर पालिकेची कारवाई थंडावल्याने नागरिकांनीदेखील हलगर्जीपणा दाखवण्यास सुरुवात केली आहे. पालिका आयुक्तांनी कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटीचा कचरा न उचलण्याचे, तसेच सोसायटीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच कचरा कुंडीमुक्त शहर करत असताना उघड्यावर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानापुरते काम न करता नवी मुंबईकरांनी वर्षभर शहरामध्ये स्वच्छता ठेवण्याकडे भर द्यावा, कचरा संकलन करणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत दररोज नागरिकांना सांगितले जावे, असे निर्देश देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नागरिकांनी घरातच कचरा ओला व सुका असा वेगवेगळा ठेवणे व तसाच वेगवेगळा देणे घनकचरा नियमानुसार अनिवार्य आहे. तर वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटी, वसाहती यांचा कचरा उचलला जाणार नाही; तर सुधारणा न झाल्यास त्यांच्याकडून दंडात्मक वसुलीदेखील करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87390 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top