घणसोली उड्डाणपुलावर खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोली उड्डाणपुलावर खड्डे
घणसोली उड्डाणपुलावर खड्डे

घणसोली उड्डाणपुलावर खड्डे

sakal_logo
By

घणसोली, ता. ४ (बातमीदार) : अवघ्या काही महिन्यांपूर्वी दुरुस्त केलेल्या घणसोली उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे पडून पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. या उड्डाणपुलावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात वाहनचालकांना होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.

नवी मुंबई शहरात पाऊस सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबई विविध भागांतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे. पावसाळा सुरू होताच घणसोली विभागातील खड्ड्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. घणसोलीहून शिळफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर अनेक खड्डे पडले आहेत व काही ठिकाणी पथदिवेदेखील बंद असल्याने खड्डे दिसेनासे होतात. यामुळे दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घणसोली उड्डाणपुलावर अपघाताच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत. रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचल्याने वाहनचालकाला खड्डा दिसेनासा होतो. यामुळे अनेकदा या खड्ड्यातून गाडी घातल्यावर वाहन चालकाला खड्डा असल्याचे समजते. लवकरात लवकर या खड्ड्यांची मलमपट्टी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

प्रशासनाकडून दुर्लक्ष
पावसाळ्यात अपघाताचा धोका टाळता यावा, यासाठी महापालिका प्रशासनामार्फत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मोहीम हाती घेतली जाते; पण पावसाळा सुरू होऊनही घणसोली उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

घणसोली उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यासंदर्भात पाहणी करण्यात येईल व लवकरात लवकर खड्ड्यांची मलमपट्टी करण्यात येईल.
- प्रशांत गावडे, विभाग अधिकारी, कोपरखैरणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87413 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..