
संभाव्य भूस्खलन भागांची पाहणी करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० ः भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा समावेश भूस्खलन आपत्ती भूभागात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये अतिवृष्टीची सूचना असल्याने संभाव्य धोक्याच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे इतर ठिकाणी तात्पुरत्या स्थलांतरासाठी योग्य जागा निवडण्याचा निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने भूस्खलन आपत्तीविषयक संक्षिप्त टिपणी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भूस्खलन होण्याची कारणे, आगाऊ सूचना देणारी निर्देशांकाची माहिती देण्यात आली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कसे करावे, याबद्दलच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व स्थानिक प्रशासनास याविषयी निर्देश दिले आहेत. भूस्खलनासंबंधित दक्ष राहून वेळोवेळी निरीक्षणे नोंदविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने भूस्खलनाचा संभाव्य धोका असलेले क्षेत्र/गावे यांचा अहवाल, नकाशे व याद्या जिल्हा प्रशासनास आपत्ती निवारण व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. या माहितीच्या आधारे स्थानिक प्रशासनाने भूस्खलन होऊ शकणाऱ्या संभाव्य गावांची पाहणी करून या धोक्याची माहिती द्यावी. तसेच संभाव्य आपत्ती निवारणासाठी तयारी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनास दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87429 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..