वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण झाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण झाले
वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण झाले

वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण झाले

sakal_logo
By

कोट
वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावा अशी इच्छा होती. आज हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होताना आम्ही याची देही याची डोळा पाहतो आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या कडवट हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासारखा सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना पाहणे हा एक दैवयोग... हा क्षण बघायला धर्मवीर आनंद दिघेसाहेब हवे होते. गरिबांची सेवा करण्याचा ध्यास घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर बाजूला सारून संपूर्ण ठाणे नव्हे, तर महाराष्ट्र हेच माझे कुटुंब आहे, असे काम करण्यास सुरुवात केली आणि उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला. शिवसेनेचे आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्या विश्वासाचे फलित आज होताना दिसते आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी आज त्यांना विराजमान होताना पाहताना आम्हाला आनंद होतो आहेच, पण प्रत्येक शिवसैनिकाला गर्व वाटावा असा हा क्षण आहे.

नरेश गणपत म्हस्के
माजी महापौर, ठाणे

भाजप हा पक्ष केवळ सत्तेसाठी नसून सत्ता ही सेवेचे साधन आहे. ही भूमिका याच्यातून अधोरेखित झाली आहे. ठाण्याला मुख्यमंत्रिपदाचा मान दिल्याबद्दल ठाणेकरांतर्फे अभिनंदन. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन. हिंदुत्व आणि विकासाचा रथ एकत्रितपणे पुढे नेऊ, असा विश्वास मला आहे.

संजय केळकर, आमदार
ठाणे शहर.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87475 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..