२३ लाखांचे अमली पदार्थ पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२३ लाखांचे अमली पदार्थ पोलिसांच्या ताब्यात
२३ लाखांचे अमली पदार्थ पोलिसांच्या ताब्यात

२३ लाखांचे अमली पदार्थ पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By

२३ लाखांचे अमली पदार्थ
कुर्ला परिसरातून जप्त
मुंबई, ता. ३० : मुंबईतील कुर्ला परिसरात एका ३२ वर्षीय व्यक्तीकडून १५६ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २३ लाख ४० हजार रुपये आहे. आरोपीचे नाव सलीम कुरेशी असून त्याला अटक करण्यात आली आहे.
बुधवारी (ता. २९) अमली पदार्थविरोधी कक्ष कांदिवली युनिट कुर्ला परिसरात गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना त्यांना आढळली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५६ ग्रॅम एमडी पोलिसांनी जप्त केले. कलम ८ (क) सह २२ (क) एनडीपीएस कायदा १९८५ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87479 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..