मुरबाडकरांना आता वेध लालदिव्याचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाडकरांना आता वेध लालदिव्याचे
मुरबाडकरांना आता वेध लालदिव्याचे

मुरबाडकरांना आता वेध लालदिव्याचे

sakal_logo
By

सरळगाव, ता. १ (बातमीदार) ः राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यावर मुरबाडकरांना लाल दिव्याचे वेध लागले आहेत. भाजपकडून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान ज्यांनी मिळवला ते मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे आहेत. मात्र भाजप-शिवसेनेची युती न झाल्याने मुरबाडकरांचे लाल दिव्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र आता पुन्हा एकदा भाजप सत्तेत आल्याने आतातरी कथोरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी महसूल मंत्री स्वर्गीय शांताराम घोलप यांच्यानंतर आजपर्यंत मुरबाड विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद न मिळाल्याने आमदार कथोरे यांना मिळावे, अशी मागणी मुरबाडकरांकडून होत आहे.
२०१९ साली विधानसभा अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार कथोरे यांना भाजपतर्फे अर्ज भरण्याची संधी मिळाली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्‍यांनी एका वर्षात दोन वेळा मुरबाड येथे कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तर विरोधी पक्ष नेतेपदी असताना त्यांनी आमदार कथोरे यांनी आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेलाही हजेरी लावली होती. त्यामुळे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून कथोरे यांची वर्णी लागेल, अशी आशा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87490 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..