उल्हासनगरात शिवसेना-भाजप युतीचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात शिवसेना-भाजप युतीचा जयघोष
उल्हासनगरात शिवसेना-भाजप युतीचा जयघोष

उल्हासनगरात शिवसेना-भाजप युतीचा जयघोष

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) ः शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच उल्हासनगरात ढोल-ताशांच्या गजरात शिवसेना-भाजप युतीच्या जयघोषाचा नारा गुंजला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे समर्थक माजी नगरसेवकांसोबत, भाजपचे माजी नगरसेवक, तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख जयकुमार केणी सहभागी झाले होते.
खासदार जनसंपर्क कार्यालयात जल्लोष साजरा करताना शिवसेनेचे अरुण आशान, विजय पाटील, कलवंतसिंह सोहता, नाना बागूल, सुरेश जाधव, स्वप्नील बागूल, युवासेनेचे जिल्हा उपसचिव युवराज पाटील, छावा संघटनेचे निखिल गोळे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख जयकुमार केणी, खासदार कार्यालय प्रमुख अरुण तांबे आणि भाजपचे जमानदास पुरस्वानी, मीना आयलानी, महेश सुखरामानी, प्रदीप रामचंदानी आदी सहभागी झाले होते.
पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कायम उल्हासनगरातील विकासकामांसाठी धावून आलेले आहेत. आता तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने ते या शहरासाठी अनेक योजना राबवतील, असा विश्वास शिवसेनेचे माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख अरुण आशान यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे २४ पैकी १२ माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सोबत आहेत. तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रधान पाटील हे देखील सोबत आहेत.
- अरुण आशान, शिवसेनेचे माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख

यांची भूमिका गुलदस्‍त्‍यात
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्‍येष्ठ माजी नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, युवासेना उपजिल्हा अधिकारी ॲड. केतन नलावडे, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, सुशील पवार यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्याने ते शिवसेनेसोबत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87493 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..