पावसामुळे मुंबईतील हवा समाधानकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे मुंबईतील हवा समाधानकारक
पावसामुळे मुंबईतील हवा समाधानकारक

पावसामुळे मुंबईतील हवा समाधानकारक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : गेल्या चार दिवसांपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. याचा सकारात्मक परिणाम मुंबईतील हवेवर झाला असून मुंबई शहराची हवा समाधानकारक दर्जाची नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील उष्णता कमी झाली असून काहीसे दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. उष्मा कमी झाल्याने प्रदूषणाची पातळीही काही प्रमाणात खाली आली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा ‘तीव्र प्रदूषणा’वरून सुधारला असून हवेच्या दर्जाची ‘उत्तम’ करण्यात आली आहे.
मुंबई शहरात आज हवा गुणवत्ता निर्देशांक ०५२ नोंदवला गेला. हवेच्या दर्जाचीही ‘समाधानकारक’ नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस सुरू झाल्यानंतरही मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागत होता; पण आता वातावरणात गारवा आहे, मात्र काही ठिकाणी कडक ऊन पडले आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या काही परिसरांमध्ये उत्तम आणि काही ठिकाणी समाधानकारक हवेची नोंद झाली आहे.
मुंबईच्या माझगाव आणि कुलाबा परिसरात सर्वाधिक प्रदूषण व हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला जातो; पण तिथलाही हवेचा दर्जा उत्तम नोंदवण्यात आला आहे. ‘सफर’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशातील चार राज्यांच्या हवेचा गुणवत्तेची नोंद केली जाते. त्यानुसार दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चारही शहरांत हवेची उत्तम गुणवत्ता आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण कमी झाले आहे. तसेच मंदावलेल्या वाऱ्याचा वेग त्याचबरोबर कमाल तापमानात होत असलेली वाढ यामुळे प्रदूषकांचा प्रसारसुद्धा कमी झाला आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील हवेचा दर्जा हा मध्यम श्रेणीत नोंदला जात होता, तो आता समाधानकारक श्रेणीत पोहचला आहे. दरम्यान, पाऊस जर असाच कायम राहिला तर शहरातील हवेचा दर्जा उत्तम राहणार असल्याचा अंदाज ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च’ (सफर) च्या संकेतस्थळातर्फे वर्तवण्यात आला आहे. याशिवाय आरोग्‍याला ही कोणता धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे.
...
स्वच्छ हवेचा अनुभव
मुंबईत शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेचा दर्जा सुधारला आहे. हवेच्या दर्जामापकानुसार, मुंबईतील हवामानाचा दर्जा ०५२ एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) असा नोंदवण्यात आला. मुंबई शहरातील लोकांनी या दिवशी स्वच्छ हवेचा अनुभव घेतला.
...
ठिकाण- एक्यूआय
मुंबई संपूर्ण शहर - ०५२
भांडुप - ०४४
कुलाबा - ०८४
मालाड - ०६८
माझगाव - ०३७
वरळी - ०७६
बोरिवली - ०४२
बीकेसी - ०७६
चेंबूर - ०४५
अंधेरी - ०८२
नवी मुंबई - ०१४
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87504 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..