मुंबई पोलिस आयुक्त आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिस आयुक्त आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई पोलिस आयुक्त आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई पोलिस आयुक्त आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावरील निवासस्थानी भेट घेतली. दोघांची ही पहिलीच भेट असून, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि गुन्हेगारीवर नियंत्रण या मुख्य मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. ही भेट म्हणजे फडणवीस यांच्याकडे आगामी काळात गृह खाते असल्याचे संकेत आहेत. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खात्‍याचाही कार्यभार होता. यामुळे आताच्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येही फडणवीसांकडेच गृह खाते असेल, अशी शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87506 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top