८५ लाखाचे अमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

८५ लाखाचे अमली पदार्थ जप्त
८५ लाखाचे अमली पदार्थ जप्त

८५ लाखाचे अमली पदार्थ जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरून शुक्रवारी ५४ किलो गांजा जप्‍त केला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८५ लाख एवढी सांगितली जात आहे. अमली पदार्थांसह दोन आरोपींना अटक केली असून, दोन्ही आरोपी ओरिसाचे नागरिक आहेत. जप्त करण्यात आलेले पदार्थ तस्करी करत ओडिशा राज्यातून आणले होते. हे पदार्थ मुंबई, सुरत आणि इतर लगतच्या जिल्ह्यांमध्ये तस्करांना वाटपासाठी नेण्यात येणार होते.

गुप्त माहितीचा मागोवा घेण्यासाठी अमली पदार्थांच्या वाहतुकीचे वेळापत्रक आणि इतर तपशिलांशी संबंधित विशिष्ट माहितीचे विश्लेषण केले गेले. यासाठी एक पथक सोलापूर-पुणे महामार्गावर रवाना करण्यात आले होते. ज्यामार्गाने अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याचे सांगण्यात आले, त्‍या मार्गावर सतत पाळत ठेवल्यानंतर, दोन प्रवासी असलेले वाहन पडताळणीसाठी थांबवण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता, मागील सीटच्या खाली लपवून ठेवलेले २७ बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये एकूण ५४ किलो गांजा होता. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी कार जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87509 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top