शेअर मार्केटच्या बहाण्याने नऊ लाख उकळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर मार्केटच्या बहाण्याने नऊ लाख उकळले
शेअर मार्केटच्या बहाण्याने नऊ लाख उकळले

शेअर मार्केटच्या बहाण्याने नऊ लाख उकळले

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा फायदा होईल, असे प्रलोभन दाखवून एका टोळीने एका व्यवसायिकाकडून तब्बल नऊ लाख रुपये उकळल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव संजू इंगळे असे असून ते मुंबईत टिळकनगर येथे राहण्यास आहेत. इंगळे यांचा फायनान्स कन्सल्टंन्सीचा व्यवसाय असून त्यांचे सीबीडी सेक्टर-१५ मध्ये दीक्षा इंटरप्रायजेस नावाने कार्यालय आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये रवी चौधरी नावाच्या व्यक्तीने शेअर मार्केटमधील ब्रोकर असल्याचे भासवून त्यांना संपर्क साधला होता. तसेच त्याने इंगळे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याने शेअर मार्केटमधील मोठा ब्रोकर आणि गुंतवणूकदार असल्याचे सांगून हरिष भाई व अशोक भाई या दोघांचे नंबर इंगळे यांना पाठवून दिले होते. त्यावेळी इंगळे यांनी हरिष भाई व अशोक भाई या दोघांशी चर्चा करून त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा निर्णय घेतला. पहिले एक लाख व नंतर आठ लाख गुंतवले. मात्र त्‍यांना काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे इंगळे यांनी हरिष भाई याच्याकडे त्याच्या डीमॅट अकाऊंटची माहिती मागितली असता त्‍यांनी टाळाटाळ केली. तसेच पैसे परत मागण्यास सुरुवात केल्‍यावर इंगळे यांचे पैसे डब्बा ट्रेडिंगमध्ये गुंतविल्याचे सांगून याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास तेच फसतील असे सांगून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्‍यानंतर त्यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात या टोळी विरोधात तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87520 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top