लक्ष्मी बाग विभागात पाणी साचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी बाग विभागात पाणी साचले
लक्ष्मी बाग विभागात पाणी साचले

लक्ष्मी बाग विभागात पाणी साचले

sakal_logo
By

धारावी, ता. २ (बातमीदार) : धारावीतील लक्ष्मी बाग येथील रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. स्थानिकांना साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच दैनंदिन व्यवहार करावे लागत आहेत; तर पादचाऱ्यांना साचलेल्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात होते. रस्ता सखल झाल्याने स्थानिक रहिवाशांना दरवर्षी या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.
धारावीतून मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने प्रवाशांची वर्दळ असते. रस्त्यावर होलसेल कपड्यांचा बाजार आहे. यामुळे या बाजारात कपड्यांच्या व्यापाऱ्यांची वाहने येत असतात. तसेच रस्त्यावरच मासळी बाजार असल्याने ग्राहकांची सतत ये-जा असते. विद्यार्थी, महिला, ज्‍येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जाणे मुश्किलीचे होत आहे. स्थानिक रहिवासी सतत याची तक्रार संबंधितांना करत असतात. मात्र, त्याचा काहीच फायदा होत नसल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87565 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top