कोपरखैरणेमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणेमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करावी
कोपरखैरणेमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करावी

कोपरखैरणेमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करावी

sakal_logo
By

बेलापूर, ता. ३ (बातमीदार) : महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैरणे परिसरात तातडीने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी अभियान राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. प्रभाग १९ मध्ये कोपरखैरणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होतो. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर रहिवाशांना दारे-खिडक्या बंद करावी लागतात. डासांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. मलेरिया, डेंगी या साथीच्या आजाराचा परिसरात उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रभाग १९ मध्ये पालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणावर डास प्रतिबंधक फवारणी अभियान राबवून रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87582 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..