
बदलापुरात आज मेगाब्लॉक
बदलापूर, ता. २ : नव्या रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचे काम उद्या (ता. ३) केले जाणार आहे. त्यामुळे तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी रेल्वेसेवा बंद असेल.
बदलापूर पूर्व पश्चिमेस कर्जत दिशेला रेल्वे पादचारी पूल नसल्याने, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. रेल्वे पूल नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून ये जा करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुलाची मागणी जोर धरत होती. अखेर रेल्वेने ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. या पुलावर गर्डर टाकण्याचे काम रविवारी (ता. ३) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी १.१० या ३ तासांत हे काम केले जाणार आहे. या वेळेत विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी सकाळी १०.२६ ची शेवटची लोकल असून कर्जत खोपोलीला जाणारी १०.२२ ची शेवटची लोकल असेल. त्यानंतर दुपारी १.१०पर्यंत रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या असून ब्लॉक संपल्यानंतर मुंबईकडे रवाना होणारी १.२२ ची लोकल असेल; तर कर्जत, खोपोलीसाठी १.४५ची लोकल असेल, अशी माहिती बदलापूर रेल्वे स्थानकप्रमुख बी. एस. सिंग यांनी दिली. आम्ही रेल्वेकडून बदलापूर एस. टी. स्टँडला पत्र दिले असून एस. टी. मंडळाने या दरम्यान बस सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या संदर्भात एस. टी. विठ्ठलवाडी डेपो येथील अधिकारी राजाराम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे कोणतेही पत्र आम्हाला मिळाले नसल्याचे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87586 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..