एकल वापर प्लास्टिकवर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकल वापर प्लास्टिकवर बंदी
एकल वापर प्लास्टिकवर बंदी

एकल वापर प्लास्टिकवर बंदी

sakal_logo
By

कल्याण, ता. २ (बातमीदार) ः केंद्र शासन व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका क्षेत्रात एकल वापराच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. देशात तसेच राज्यात एकल वापराच्या प्लास्टिकवर १ जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज अत्रे रंगमंदिर येथील कॉन्फरन्स हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या या पर्यावरणास हानीकारक ठरतात. त्यामुळे पर्यावरणास घातक ठरणाऱ्या एकल वापर प्लास्टिक पिशव्यांवर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी महापालिका क्षेत्रात प्लास्टिक वस्तूंवर बंदीबाबत माहिती दिली. सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टिरीन (थर्माकोल) मिठाईचे बॉक्स, आंमत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या कांड्यांसह कानकोरणे, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रिम कांड्या/प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी घालण्यात आली आहे. कम्पोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, हॅण्डल असलेल्या व नसलेल्या डिश, बाउल, कॅन्टेनर (डब्बे) इत्यादी एकल वापर प्लास्टिक वस्तूंवर बंदी केली आहे. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे विभागीय अधिकारी कुकडे, उपविभागीय अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, महापालिकचे उपायुक्त अर्चना दिवे, पल्लवी भागवत, धैर्यशील जाधव, वंदना गुळवे, महापालिका सचिव संजय जाधव व सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, व्यापारीवर्ग, एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------
गुन्हेगाराला कडक शिक्षा
प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचनेअंतर्गत दंड दुकानदार, फळे व भाजीविक्रेते, व्यापाऱ्यांनी पहिल्यांदा गुन्हा केल्यास ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा केल्यास १० हजार रुपये, तिसरा गुन्हा केल्यास २५ हजार रुपये व ३ महिन्यांचा कारावास अशी दंडाची आकारणी केली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87587 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..