विरार येथे आज ग्रामीण साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार येथे आज ग्रामीण साहित्य संमेलन
विरार येथे आज ग्रामीण साहित्य संमेलन

विरार येथे आज ग्रामीण साहित्य संमेलन

sakal_logo
By

विरार, ता. २ (बातमीदार) ः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हा यांच्यातर्फे पालघरमध्ये ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवारी (ता.१०) विरारमधील आयंबिल भवन येथे होणार आहे. कवी-कवयित्रींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हे संमेलन भरवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. अ. ना. रसनकुटे यांची निवड करण्यात आली आहे, तर स्वागताध्यक्ष कवयित्री प्रा. शुभम राजेश पाटील असणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी शरद गोरे, शुभांगी काळभोर, डॉ. अलका नाईक आणि संदीप तोडकर यांचे मार्गदर्शन ग्रामीण साहित्य संमेलनास लाभणार आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजनात पालघर जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी प्रा. शुभम पाटील, अ‍ॅड. नयन जैन, मंजुषा गवई, डॉ. कमलाकर संखे, अनिल धारुळकर, गजानन राणे, डॉ. नेहा संखे, मोहन राऊत, विक्रांत केसरकर, विद्या गिरीधर, डॉ. मंगला परब, तसेच विरार शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी अ‍ॅड. विलास राऊत, राजेश बक्षी, अ‍ॅड. अर्चना जैन, अ‍ॅड. नेहा धारुळकर यांचे सक्रिय सहकार्य असणार आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्समधील उपांत्य फेरीतील विजेती पलाक्षी दीक्षित हिचे गायन या साहित्य संमेलनातील प्रमुख आकर्षण आहे. संमेलनात सादर करण्यात येणारी कविता जास्तीत जास्त वीस ओळींची असावी. प्रत्येक कवीस सादरीकरणास ३ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. कवींनी आपली नोंदणी मंजूषा गवई (९५०३५७३०१५) आणि अ‍ॅड. अर्चना जैन (७७०९१४०७४७) यांच्याकडे करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87588 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top