शहापूर तालुक्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic Ban
शहापूर तालुक्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा

शहापूर तालुक्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा

खर्डी : शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय एक वर्षापूर्वी लागू करण्यात आला; मात्र शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याने प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे राजरोस प्लास्टिकचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. शासनाने आणखी कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. प्लास्टिकला पर्याय देऊन शासनातर्फे स्वस्त भावात कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

शहापूर तालुक्यातील वासिंद, आसनगाव, किनव्हली, खर्डी व कसारा येथील मुख्य बाजारपेठेसह खेड्यापाड्यात सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरू आहे. भाजीपाला, मटण, फुले, फळे ,बेकरी, दूध यांच्या विक्रेत्यांसह हातगाडी व फेरीवाले यांच्यासहित ग्राहकांच्या हातात प्लास्टिक कॅरीबॅग दिसत आहेत. शासनाने जुलै २०२१ पासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणार असल्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते; परंतु जुलै २०२२ उजाडला, तरी याबाबत ग्रापनी स्पीकरद्वारे प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती करणे गरजेचे होते. एक वर्षांपासून जनजागृती न झाल्याने व आजही खेड्यापाड्यात खुलेआम प्लास्टिक पिशव्या व इतर सामानाची विक्री व ने-आण सुरू आहे.

काही जण ग्राहकांना घाबरवून कापडी पिशव्या दुप्पट भावात विकत असल्याने गोरगरीब ग्राहक कारवाईच्या भीतीने व्यापारी व शासनाच्या आदेशाच्या कचाट्यात सापडला आहे. हातावर पोट असणारे लोकांना बाजारातून सामान घरी न्यायचा कोणताही स्वस्त पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात; परंतु एखाद्या भरारी पथकाने त्यांच्यावर कारवाई केल्यास ते ५ हजार रुपये कुठून भरतील?
- दशरथ भालके, जिल्हा सचिव, श्रमजीवी संघटना


शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदी राबवण्यासाठी सर्व ग्राम पंचायतींना आदेश देण्यात आले आहेत. बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर नागरिकांनी करू नये व महत्वाच्या ग्रापंमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
- भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी, शहापूर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87601 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top