मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला!
मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला!

मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : मुंबईतील मेट्रो-३ म्हणजे कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा भुयारी प्रकल्प आता सफेद हत्ती होण्याच्या मार्गावर आहे. दिरंगाईमुळे प्रकल्पाच्या खर्चाचा डोंगर हा दिवसागणिक वाढतच चालला आहे. एकीकडे कारशेडच्या जागेसाठी रखडलेल्या या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटींनी वाढली असताना, दुसरीकडे प्रकल्पाचा सुरू होण्याचा कालावधीही एक वर्षाने पुढे गेला आहे. 
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मेट्रो-३ प्रकल्पाच्या रखडलेल्या कारशेडचा निर्णय घेतला. हे कारशेड आरे येथेच उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयात ही बाजू मांडण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसी) माध्यमातून मेट्रो-३ चे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५३.७८ किलोमीटर म्हणजेच ९८.६० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील भुयारीकरण, स्थानके बांधणे आणि कारशेडची निर्मिती असा तिन्ही गोष्टींचा प्रस्तावित खर्च हा १० हजार ७०८ कोटी इतका होता. हाच खर्च आता दुप्पट म्हणजे २० हजार कोटींच्या घरात गेला आहे.
प्रकल्पाचा खर्च २०१८ या वर्षांच्या अंदाजानुसार २३ हजार कोटी इतका अपेक्षित होता. याच खर्चात गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत १० हजार कोटींची वाढ झाली आहे. आता या प्रकल्पासाठी ३३ हजार ४०६ कोटी इतका खर्च प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या खर्चामध्ये सर्वाधिक खर्च हा भूसंपादनाचाही होता. २०११ च्या अंदाजानुसार प्रकल्पाच्या भूसंपादनाचा खर्च ५९० कोटी रुपये इतका अपेक्षित होता. २०१८ च्या सुधारित अंदाजानुसार हा खर्च तिप्पट म्हणजे १५०० कोटी इतका झाला.

कांजूरचा पर्याय स्वस्तच
१) मेट्रो-३ च्या कारशेडसाठी नेमलेल्या नऊ सदस्यीय समितीने मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेत दाखल केलेल्या अहवालानुसार कांजूरमार्गचा पर्याय हा १,५८० कोटी रुपयांची बचत करणारा आहे. यामध्ये भूसंपादन आणि बांधकामाच्या खर्चाचा समावेश आहे. शिवाय आरे कारशेडच्या तुलनेत कांजूरला अधिक क्षमतेच्या तसेच आणखी मार्गांसाठी कारशेड वापराचीही उपलब्धता होऊ शकते.
२) सध्या आरे कारशेडच्या ठिकाणी ३० ट्रेन ठेवण्याची सुविधा आहे. हीच सुविधा कांजूरमार्ग येथे ५५ इतकी आहे. मेट्रो मार्ग ३, ४ आणि ६ साठीचा इंटिग्रेटेड डेपो म्हणूनही या काजूरच्या जागेची उपयुक्तता असल्याचे समितीने आपल्या अहवालात नमूद केले होते. तसेच कांजूरला प्रकल्प १४ आणि ६ साठीचे इंटरचेंजिंग स्टेशनही या ठिकाणी प्रस्तावित करता येईल, असेही समितीने अहवालात सुचवले होते.

कोणता खर्च वाढला  
कामाचे स्वरूप    प्रस्तावित     खर्चात वाढ (कोटींमध्ये) 
बांधकामे      १०,७०८    १८७११
यंत्रणा      ३१२८        ४३९१
भूसंपादन/पुनर्वसन ५९०    १४८३
एकूण        २३,०००        ३३,४०६

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87618 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..