कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू
कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : कारचोरांना पकडण्याच्या नादात उलवे येथून उरण फाटा येथे ट्रिपल सीट आलेल्या तरुणांच्या स्कुटीला भरधाव कंटेनर ट्रेलरने धडक दिल्याने दोघा तरुणांचा कंटेनर ट्रेलरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला; तर तिसरा तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १) पहाटे उरण फाटा येथे घडली. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने त्या ठिकाणावरून पलायन केले असून सीबीडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या अपघातातील मृतांमध्ये निखिल राजेश पय्यर (वय २५) व साहिल बाजीराव पाटील (वय १८) या दोघांचा समावेश आहे. जखमी तरुणाचे नाव मानव नामदेव पाटील (वय १७) आहे. शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात तरुण निखिल पय्यर याच्या कारजवळ उभे राहून कारचोरी करण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब निखिलला समजल्यानंतर त्याने आपल्या सर्व मित्रांना बोलावून घेतले; मात्र चोरांना या तरुणांची कुणकुण लागताच ते पळून गेल्याने निखिल, साहील तसेच मानव हे तिघेही साहिलच्या स्कुटीवरून; तर त्यांचे इतर चार मित्र त्यांच्या कारने त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले होते. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उरण फाटा ब्रिजच्या अलिकडे निखिल व त्याचे मित्र असलेल्या स्कुटीला भरधाव कंटेनर ट्रेलरने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. या वेळी कंटेनर ट्रेलरचालकाने कंटनेर तेथेच सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखिलच्या मित्रांनी त्याला पकडून कंटेनर पुढे घेण्यास सांगून कंटेनरच्या चाकाखाली अडकून पडलेल्या साहिलला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी या सर्व जखमींना वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या प्रकारानंतर कंटेनर ट्रेलरचालक पळून गेला असून सीबीडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87621 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..