श्री माँ विद्यालय आयोजित योग स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री माँ विद्यालय आयोजित योग स्पर्धेला प्रतिसाद
श्री माँ विद्यालय आयोजित योग स्पर्धेला प्रतिसाद

श्री माँ विद्यालय आयोजित योग स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

ठाणे, ता. ३ (बातमीदार) : घोडबंदर रोड, पातलीपाडा येथील श्री माँ विद्यालयाच्या वतीने २ जुलै रोजी ठाण्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता आंतरशालेय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ३० शाळांमधील ३५० मुलांनी सहभाग घेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
एकल आणि समूह अशा दोन गटांत पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यावेळी मुला-मुलींनी विविध योगासनांची व योग मुद्रांची प्रात्यक्षिके सादर करून दाखविली. या स्पर्धेत आठवी ते दहावी समूहात पहिले पारितोषिक एसव्हीपीएम कळवा, द्वितीय पारितोषिक सरस्वती विद्यालय राबोडी आणि तृतीय पारितोषिक न्यू होरायझॉन ठाणे यांनी पटकावले; तर पहिला उपविजेता होण्याचा मान डीएव्ही पब्लिक स्कूल ठाणे, तर दुसरा मान नवोदया हायस्कूल, ठाणे यांनी पटकावला. आठवी ते दहावी सोलो स्पर्धेत पहिला क्रमांक तनिष्का सादेकर ज्ञानप्रसारिणी स्कूल कळवा, द्वितीय क्रमांक श्रेया पाटील, ज्ञानप्रसारिणी स्कूल कळवा, तृतीय क्रमांक आर्या पाटील, ज्ञानप्रसारणी स्कूल, कळवा यांनी पटकावले. पहिली उपविजेती होण्याचा मान आरोही वायकूळ आणि दत्ता मेघे यांनी मिळवला. पाचवी ते सातवी समूह स्पर्धेत पहिले पारितोषिक आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल शहापूर, द्वितीय पारितोषिक शेठ एनकेटी ठाणे, तृतीय पारितोषिक एसव्हीपीएम, कळवा यांनी पटकावले. इयत्ता पाचवी ते सातवी सोलो स्पर्धेत पहिला क्रमांक निकीता कोपकोटी, लोकपुरम स्कूल, द्वितीय क्रमांक हर्षल थोरात, तर आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, शहापूर, तृतीय क्रमांक रिद्धी गार्गे यांनी पटकावला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87644 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..