रोटरी क्लब ऑफ बदलापूरतर्फे रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लब ऑफ बदलापूरतर्फे रक्तदान शिबिर
रोटरी क्लब ऑफ बदलापूरतर्फे रक्तदान शिबिर

रोटरी क्लब ऑफ बदलापूरतर्फे रक्तदान शिबिर

sakal_logo
By

ठाणे, ता. ३ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ बदलापूरतर्फे डॉक्टर डेचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक जुलै रोजी रक्तदान शिबिराची मोहीम राबवण्यात आली असून, ४० युनिट्स रक्त जमा करण्यात आले.
रोटरॅक्ट क्लब ऑफ भारत कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना, रोटरॅक्ट क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर बदलापूर येथील भारत कॉलेज येथे घेण्यात आले होते. जे. जे. महानगर रक्तपेढी आणि त्यांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य शिबिरासाठी मिळाले. या शिबिराला भारत कॉलेजच्या प्राचार्य नीतू कपूर, प्राध्यापिका पूर्वा ओक, रोटरी क्लबच्या चिटणीस अश्विनी बुलाख, भारत सरूप, डॉ. चुरी, डॉ. प्रियंका सदावर्ते, डॉ. श्रद्धा सोमण इत्यादी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87646 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..