शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण
शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण

शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण

sakal_logo
By

मुरबाड, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण केली आहेत; तर ज्या भागात लवकर पेरणी झाली तेथे भाताची रोपे वीतभर उंच वाढली असल्‍याचे चित्र आहे.
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड तालुक्यात आता बरेच शेतजमीन मालक स्वतः जमीन कसत नाहीत, तर काही शेतकरी मक्त्याने तर काही अर्ध्या हिश्श्याने जमीन कसायला देत आहेत. बरीच जमीन भात लागवड न झाल्याने ओसाड पडून राहते. मुरबाड तालुक्यातील झिणी तांदूळ प्रसिद्ध आहे; परंतु रोग लवकर पडत असल्याने व इतर भाताला सुद्धा सरकारचा चांगला हमीभाव मिळत नसल्याने झिणी भात नष्ट होत चालला आहे. नारीवली, म्हसा चोविसी परिसरात पूर्वी झिणी भात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात होती. मात्र, आता शेतकऱ्यांचा कल नवीन जातीच्या भात बियाण्यांकडे वाढल्याने ही जात संपुष्टात येणार आहे.
------------------------------------------------
कागदोपत्री भात लागवड वाढली
सरकारच्‍या एकात्मिक धान खरेदी योजनेमध्ये भात पिकाला चांगला हमीभाव मिळत असल्याने हल्ली कागदोपत्री शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. बरेच शेतकरी व्यापाऱ्यांकडून कमी दराने मिळणारा भात खरेदी करून त्याची सरकारला जास्त भावाने विक्री करत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. भात व्यापाऱ्यांचा व सात बारा उतारा शेतकऱ्याचा अशी ही बनवाबनवी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
--------------------------------------
फोटो ओळी
मुरबाड : शेतकऱ्यांनी पेरलेल्या भात बियाण्यांची रोपे तरारली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87648 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top