खारघरमधील अंबेमाता मंदिरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमधील अंबेमाता मंदिरात चोरी
खारघरमधील अंबेमाता मंदिरात चोरी

खारघरमधील अंबेमाता मंदिरात चोरी

sakal_logo
By

खारघर, ता. ३ (बातमीदार) : सेक्टर पाचमधील अंबेमाता मंदिरात चोरी झाल्याची घटना रात्रीच्यावेळी घडली आहे. मंदिरातील चांदीची कृष्णमूर्ती, पादुका आणि पंचधातूची तलवार असा सुमारे दोन लाखांच्या ऐवजाची चोरी झाली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघरमधील सेक्टर पाच परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या भागात अंबेमाता मंदिर आहे. दिवसा भक्तांची मांदियाळी असते. निवासी वसाहतीपासून पन्नास फूट अंतर दूर असल्यामुळे रात्रीच्या वेळी कोणी नसते. ही संधी साधून चोरट्यांनी सदर मंदिरातील दीड फुटांची श्रीकृष्ण मूर्ती, चांदीच्या पादुका आणि गदा, तसेच पंचधातूची तलवार आणि आंबे मातेच्या गळ्यात असलेले दागिने घेऊन पसार झाले. या विषयी मंदिर व व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, चोरटे मंदिरातील मूर्ती घेऊन बाहेर आले, मात्र मूर्ती ठेवून त्यावरील सर्व दागिने घेऊन लंपास केले. सदर दागिने बनावट होते. सदर प्रकाराची माहिती खारघर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मंदिर परिसरात सीसी टीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू आहे, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87655 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..